Cloves Chewing | दररोज दोन लवंग चघळल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Cloves Chewing | टीम महाराष्ट्र देशा: बहुतेक भारतीय स्वयंपाकघरामध्ये लवंग वापरले जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. त्याचबरोबर लवंगाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. लवंगामध्ये विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, आयरन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडेंट यासारखे पोषण घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज दोन लवंग चघळल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. दररोज दोन लवंग चघळल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Cloves Chewing Benefits)

लवंगांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याचबरोबर लवंगामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यास मदत करतात. दररोज दोन लवंग चघळल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहतात.

सर्दी खोकल्यापासून संरक्षण (Protection against cold and cough-Cloves Chewing Benefits)

सर्दी खोकल्याच्या समस्यावर मात करण्यासाठी लवंगाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. लवंगामध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात, जे सर्दी खोकल्यापासून तुमची सुटका करण्यास मदत करतात. नियमित लवंगाचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

पचनक्रिया व्यवस्थित राहते (Digestion remains normal-Cloves Chewing Benefits)

सकाळी रिकाम्या पोटी दोन लवंग चघळल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. लवंग पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. लवंगाचे नियमित सेवन केल्याने पोटातील गॅस, बद्धकोष्टता, ऍसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकतो.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग चघळल्याने आरोग्यावरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सकाळी रिकामी पोटी तुम्ही खालील गोष्टींची सेवन करू शकतात.

सुका मेवा (Dry fruits-For Strong Memory)

मेंदू निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सुक्या मेव्याचे सेवन करू शकतात. सुक्या मेव्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे मेंदूची काळजी घेण्यास आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बदाम, अक्रोड, मनुके इत्यादींचे सेवन करू शकतात.

ॲवोकॅडो (Avocado-For Strong Memory)

ॲवोकॅडोमध्ये भरपूर पोषक तत्व आढळून येतात, जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ॲवोकॅडो सेवन केल्याने मेंदू निरोगी राहतो आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. ॲवोकॅडोचे सकाळी रिकाम्या पोटी नियमित सेवन केल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या