Uddhav Thackeray | ठाकरेंना धक्का? सेना भवन अन् पक्ष निधी शिंदे गटाला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

Uddhav Thackeray | नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय आयोगाने दिला. त्यामळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वकिल आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसंच, मी कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचं गिरी यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसंच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालावेत. याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या निकालासंदर्भात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता माझी देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी,” अशी मागणीही गिरी यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लागण्यात यावे,” असे गिरी म्हणाले. यामुळे आता सेना भवन अन् पक्ष निधी शिंदे गटाकडे जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.