माझ्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी अकोलामध्ये पत्रकार परिषद घेतली. आंबेडकर यांनी अनेक विषयांवरील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या आणि वंचित आघाडीच्या नादाला लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनी अकोलामध्ये पत्रकार परिषद कडक शब्दात उत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदमध्ये आंबेडकर म्हणाले,  निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण पाहू शकतो की, आतापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. म्हणूनच आम्ही मुंबईचे उमेदवार जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. त्याचे कारण की, निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजप घेईल, अशी शक्यता आम्हाला वाटत होती.

सांगलीत शिवसेनेचे काहीच नव्हते, पण माननीय शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि बरीच चर्चाही केली आहे.आणि थोड्याच वेळात ते निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मुंबईसारख्या शहरात शिवसेनेने लुंगी हटाव, पुंगी बजाव आंदोलन केले आहेत. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी मध्ये छट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना सुद्धा मारले. त्यामुळे मुंबईमध्ये जे बिहारमधील नागरिक राहतात त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.