पेटीएम पेमेंट्स बँकेचे मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा

Paytm Payments Bank Managing Director and CEO Surinder Chawla resigns latest news

Paytm
  • Paytm Payments Bank CEO Surinder Chawla resigns
  • Paytm Payments Bank's MD, CEO Surinder Chawla resigns

Paytm CEO Surinder Chawla । वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अडचणीत सापडलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती बँकेने मंगळवारी भांडवली बाजाराला दिली.

देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी ‘पेटीएम’च्या व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर जानेवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारला होता.

बँकेला प्रतिबंधात्मक कारवाईचा सामना करावा लागत असतानाच चावला यांच्या राजीनाम्याने बॅंकेसमोरील आव्हान वाढले आहे.

सुरिंदर चावला यांनी रविवारी, ८ एप्रिलला वैयक्तिक कारणांमुळे आणि अधिक चांगल्या संधी शोधण्यासाठी राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. येत्या २६ जून २०२४ रोजी ते पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी पदाच्या कार्यभारातून मुक्त होतील. गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये चावला पेटीएम पेमेंट्स बँकेत रुजू झाले होते.

Paytm Payments Bank CEO Surinder Chawla resigns

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.