Trending

राज ठाकरे यांचा मोदींना बिनशर्त पाठिंबा!; रेल्वे इंजिन भाजपच्या दिशेने धावणार

Raj Thackeray narendra modi amit shah bjp

Raj Thackeray
  • Raj Thackeray Declares 'Unconditional Support' For BJP
  • Raj Thackeray declare his party support to Narendra Modi & BJP
  • Raj Thackeray backs Mahayuti alliance

Raj Thackeray मुंबई : भारताला आज खंबीर नेतृत्वाची गरज असून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली.

या पाठिंब्याच्या बदल्यात आपल्याला राज्यसभा किंवा विधानपरिषद असे काहीही नको, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा’ असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या दीड वर्षांपासून आपण एकत्र येऊ या, असे म्हणत होते. एकत्र येऊ या म्हणजे नेमके काय करायचे, याबाबत त्यांच्याकडून कोणतीच स्पष्टता येत नव्हती. म्हणून आपण थेट गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची विनंती केली. त्यानुसार ही भेट झाली,’ असे राज म्हणाले.

भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला. पण जागांबाबत वाटाघाटी आणि भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे प्रस्ताव मान्य नाही, असे राज यांनी सांगितले. आपण एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करून शिवसेनाप्रमुख व्हावे, अशी चर्चा सुरू होती. पण मी कदापिही मनसे आणि रेल्वे इंजिन या चिन्हाचा त्याग करणार नाही, असेही राज यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून आपले त्यांच्याशी चांगले संबंध असून ते देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी सर्वात प्रथम जाहीर अपेक्षा आपणच व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर नोटबंदी, बुलेट ट्रेन या प्रकल्पांना आजही आपला विरोध कायम असून त्यांच्या न पटणाऱ्या धोरण, निर्णयावरही टोकाचा विरोध केला होता.

मात्र, जम्मू-कश्मीरमधील ३७० कलम कायदा, समान नागरी कायदा याचे समर्थन करणाऱ्यांमध्ये आपणच पहिले होतो, असेही राज म्हणाले. ही लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. राजकारणात आताच हाणामाऱ्या सुरू आहेत. विधानसभेला तर कोथळे बाहेर काढतील. कोण कोणत्या पक्षात आहे ते कळायला मार्ग नाही. आपण मनसेच्या माध्यमातून या महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवू, असा दावा राज यांनी केला.

उद्धव ठाकरेंवर टीका

पंतप्रधान मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत, तशी टीका आपण कधीही केलेली नाही. केवळ चुकीच्या भूमिकेला विरोध केला आहे. मुख्यमंत्रीपद गेले, पक्ष फुटला, सत्ता गेली म्हणून आज टीका करणाऱ्यांनी आपण ज्यावेळी मोदींविरोधात भूमिका घेतली त्यावेळी खिशातले राजीनामे बाहेर काढून आपल्यासोबत येण्याची भूमिका का घेतली नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

Raj Thackeray declare his party support to Narendra Modi & BJP

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.