Vinod Tawde | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. तसेच निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोशल माध्यमांचा वापर केला जात आहे.
सुषमा सुषमा अंधारे यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली, अंधारे लिहितात की, ”पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी, जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी, श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणविसाना 2-2 दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ.. फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलेय..! अशी पोस्ट करत #आताकधीचयेणारनाही असा हॅशटॅगही अंधारे यांनी वापरला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अश्यात फडणवीसांना विनोद तावडेंनी चितपट केल्याचा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी जळगाव चा उमेदवार बदलण्याची तयारी, श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणविसाना 2-2दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ..
फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलेय..! #आताकधीचयेणारनाही pic.twitter.com/znekHdKydV— SushmaTai Andhare (@andharesushama) April 6, 2024
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीसांनी एकाधिकारशाही गाजवत विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांना डावलले असल्याचा आरोप आहे. तसेच विनोद तावडे यांना २०१९ साली विधानसभेची उमेदवारी फडणवीस यांनी मिळवून दिली नव्हती.
दरम्यान, आता चित्र बदलेले आहे, विनोद तावडे हे भाजपच्या केंद्रीय निवडप्रक्रियेत सामील झाले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी मागण्यासाठी त्यांच्याकडे जाण्याची वेळ आहे.
महत्वाच्या बातम्या