Ajit pawar vs Jitendra awhad | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. सुप्रिया सुळे या शरद पवार गटात आहेत. शरद पवारांच्या गटात असल्याने सुळे यांना अनेक वेळा अजित पवारांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. काही दिवसापूर्वी अजित पवारांनी भर सभेत सुप्रिया सुळे यांची मिमीक्री करत टीका केली होती.
यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली की, “बहिणीची नक्कल करणारा पहिला भाऊ महाराष्ट्राने पहिला आहे. सुप्रिया सुळे अजित पवारांना सारखं माझा दादा, माझा दादा करायच्या. मला प्रचंड राग यायचा. आता राग शांत झाला आहे. पण हे प्रेम बहिणीचं होतं, हे प्रेम आपलेपणाचं होतं. हे प्रेम घर तुटू नये म्हणून होतं. पण दादा तुम्हाला समजलंच नाही. प्रेम समजायला हृदय लागतं.”
आव्हाडांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनीही उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “जितेंद्र आव्हाड माझ्यावर तुटून पडले. पण, मी त्यांना एक गोष्ट सांगितली की रिश्ते तोडना बहोत आसान है, पर रिश्ते निभाने के लिए ताकद लगती है।. मी नातं जोडणाऱ्यातली आहे, तोडणाऱ्यातली नाही.”
महत्वाच्या बातम्या