Share

सुधीर मुनगंटीवारांना पॉवरफुल शिलाजीत देऊ, काम अती जोरात होईल – नितीन गडकरी

Nitin Gadkari | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्याच्या मतदानासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. यामुळे सगळीकडे निवडणूक प्रचार सभांचा जोर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे.

दरम्यानच चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा इथे जाहीर सभा घेण्यात आली. तेथील सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेला संबोधित करताना गडकरी म्हणाले कि, ”मी जे बोलतो ते करुन दाखवतो. सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या कर्तुत्ववान  उमेदवाराला संसदेत पाठवा. मुनगंटीवार यांच्या मागे नरेंद्र मोदीजींची ताकद, माझी ताकद आणि ट्रीपल इंजिन असेल. मुनगंटीवारांना अस पॉवरफुल शिलाजीत देऊ की बास विकासाचं काम एकदम जोरात होईल” गडकरी यांच्या भाषणाने लोकांमध्ये हशा पिकला शिवाय टाळ्यांचा कडकडाट झाला.

Nitin Gadkari Sudhir Munangtiwar Chandrapur sabha

महत्वाच्या बातम्या

Nitin Gadkari | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्याच्या मतदानासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. यामुळे सगळीकडे निवडणूक प्रचार सभांचा जोर पाहायला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics