Eknath Khadse | एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, शरद पवारांनी मला जर राष्ट्रवादीत पक्षात घेतले नसते तर माझे राजकीय करिअर पूर्णपणे संपले असते, पण आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे हे पु्न्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे आज रात्रीच खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं त्यांनी मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
एकनाथ खडसे २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतु त्यावेळी भाजपने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे खडसे नाराज झाले होते. त्यानंतर खडसे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष सुरु झाला.
भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्ती जास्त जागा जिंकण्यासाठी मागील काही महिन्यांपासून अनेक नेत्यांना सोबत घेतलं आहे. अशातच उत्तर महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क असलेल्या एकनाथ खडसे यांना सोबत घेतल्यास जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल, त्यादृष्टीनेच खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण
- किरीट सोमय्यांच्या दाव्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत; कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा फाटला
- रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; खेकड्याचा छळ केल्याचा ‘पेटा इंडिया’चा आरोप
- अंबाजोगाई । ’चले जाव,चले जाव’ मराठा विरोधक चले जाव; मुंडें विरोधात घोषणाबाजी