Share

शिंदे-फडणवीसांना जोरदार झटका; महायुतीच्या मोठ्या नेत्याचा काँग्रेसला पाठिंबा

Bacchu Kadu | महाविकास आघाडीनंतर महायुतीमध्ये खटके उडायला सुरवात झाली आहे. महायुतीत कल्याण, अमरावती, रायगड, नाशिक, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर येथे जागा वाटपावरून वाद सुरु आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी या पूर्वीच विरोध दर्शवला होता. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी जागावाटपावर महायुतीत ठिणगी पडायला सुरवात झाली आहे.

दरम्यान महायुतीविरोधात बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचे चित्र सद्या राज्यात पाहायला मिळत आहे. अमरावती नंतर रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचे समोर आले आहे.

नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरुन बच्चू कडू नाराज आहेत. महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी मत मागणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. त्यानंतर आता रामटेक लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू यांनी काँग्रेसला समर्थन जाहीर केले. म्हणजे बच्चू कडू महायुतीविरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

महायुतीमध्ये बच्चू कडू यांचा सन्मान होत नाही त्यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.  प्रहार पक्षाने लोकसभेसाठी एक जागा मागितली होती आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता, तरीही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. यामुळे बच्चू कडू आंक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Bacchu Kadu | महाविकास आघाडीनंतर महायुतीमध्ये खटके उडायला सुरवात झाली आहे. महायुतीत कल्याण, अमरावती, रायगड, नाशिक, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now