Archana Patil । माझा नवरा भाजपचा (BJP) आमदार आहे. मी कशाला अजित पवारांची राष्ट्रवादी वाढवू, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या धाराशीव लोकसभेच्या ( Dharashiv Lok Sabha Constituency ) उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील (Archana Patil) यांनी केलं आहे.
अर्चना पाटील प्रचारासाठी बार्शीत आल्या होत्या. यावेळी बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. त्यामुळं आपण बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारला होता. यावर मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं त्या म्हणाल्या. पाटील यांच्या व्यक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
अर्चना पाटील या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. अर्चना पाटील यांनी लोकसभेसाठी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे.
अर्चना पाटील यांच्या व्यक्तव्यानंतर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अर्चना पाटील यांनी ज्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्यांनी म्हटलं आहे.
Dharashiv Lok Sabha Constituency Archana Patil vs Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या