दोन हजारांच्या ८,२०२ कोटी मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

2000 Note मुंबई: रिझर्व्ह बँकेने वितरणातून काढून टाकलेल्या २,००० रुपयांच्या सुमारे ९७.६९ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत आणि ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती आणि या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली गेली होती. नंतर ही अंतिम मुदत ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती.

रिझर्व्ह बँकेने नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा ज्या दिवशी केली त्या १९ मे २०२३ रोजी कामकाज समाप्तीच्या वेळी चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते.

तर २९ मार्च २०२४ रोजी कामकाज समाप्तीच्या वेळी अद्याप लोकांहाती असलेल्या या नोटांचे मूल्य ८,२०२ कोटी रुपयांवर घसरल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.