🕒 1 min read
Loksabha Election 2024 । लोकसभा निवडणुकी साठी मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रकाशित केली आहे. या यादीत आजच आपलं नाव तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा. ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने तुम्हाला मतदान करता येणार नाही.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये म्हणजेच – 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी Loksabha Election 2024 या लिंकवर क्लिक करा.
यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?
1. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम या लिंकवर क्लिक करा – https://voters.eci.gov.in/
2. वेबसाईटच्या मुखपृष्ठावरील ‘Search in Electoral Roll’ टॅबवर क्लिक करा.
3. आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. ‘Search by Details’, ‘Search by EPIC’, ‘Search by Mobile’ या पैकी एका पर्यायावर क्लिक करा.
4. आवश्यक माहिती (Basic Information) आणि कॅप्चा कोड सबमिट करा, यानंतर ‘Search’ वर क्लिक करा.
5. यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.
6. जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.
Loksabha Election 2024 voters list
महत्वाच्या बातम्या
- रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ; सरकारी कार्यालयाचा सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी वापर
- विनोद तावडेंच्या मोठ्या खेळीने देवेंद्र फडणवीसांना घाम फोडला
- “सुप्रिया सुळे सारखं दादा-दादा करायच्या, तेव्हा मला राग यायचा”- जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










