‘लव्ह जिहाद’वरून विद्यार्थ्याला मारहाण; हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Youth Beaten Up By Accusing Him Of Love Jihad Type In Savitribai Phule Pune University Pune

Love Jihad
  • Savitribai Phule Pune University Pune
  • Youth Beaten Up By Accusing Him Of Love Jihad In Savitribai Phule Pune University Pune

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात ‘लव्ह जिहाद’चा आरोप करून एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी चार जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला. अन्यधर्मीय तरुणीशी असलेली मैत्री तोडावी, म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे.

तक्रारदार तरुण हा विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी आहे. तो आणि त्याची मैत्रीण विद्यापीठातील उपाहारगृहातून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या चार-पाच जणांनी त्यांना अडवले. आम्ही एका हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहोत, असे सांगत त्यांनी दोघांकडे आधारकार्ड मागितली.

दोघांच्या धर्माबाबत विचारणा करून ‘लव्ह जिहाद’ करत असल्याचे सांगत तक्रारदार तरुणाला धमकावले. तरुणाच्या वडिलांना फोन करून त्याला घेऊन जाण्यास सांगण्यात आले. यावेळी आपल्याला मारहाण करून वसतिगृहावर नेले व कपडे भरून निघून जा. परत येथे दिसता कामा नये, अशी धमकी दिल्याचा दिली, अशी फिर्याद तरुणाने दिली आहे.

नेमकं काय घडलं?

तरुण विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी आहे. तरुण आणि त्याची मैत्रीण विद्यापीठातील उपहारगृहातून निघाले. त्यानंतर काही जण टू व्हिलरवरुन आले आणि दोघांना अडवलं आणि आम्ही हिंदु संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं त्यांनी सांगितलं.

या नंतर तरुणाला मारहाण केली आणि तरुणीला बाजूला घेऊन तिला लव्ह जिहाद संदर्भात माहिती दिली. तरुणाच्या पालकांना फोन करुन मुलाला घेऊन जा नाहीतर… , अशी धमकी दिली. या प्रकरणी आता पुढील चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणी तरुणाने वसतीगृह प्रमुखाकडे तक्रार केली. त्यात कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचं नमूद केलं आहे. ‘मला धमकावून वसतिगृहावर नेले. कपडे भरून निघून जा. परत येथे दिसता कामा नये’, अशी धमकी दिल्याचं तरुणाने तक्रारीत नमूद केलं आहे.

Youth Beaten Up By Accusing Him Of Love Jihad In Savitribai Phule Pune University Pune

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.