Share

Nana Patole | “भगवे कपडे घालून कुणी हिंदू होत नाही, रावणानेही भगवे कपडे घालून…”, नाना पटोलेंचा शिंदे सरकारला खोचक टोला

🕒 1 min readNana Patole | मुंबई :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. भगवे कपडे घालून कोणी हिंदू होत नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर रविवारी (9 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी अयोध्येचा दौरा केला. त्यांच्या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | मुंबई :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. भगवे कपडे घालून कोणी हिंदू होत नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर रविवारी (9 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी अयोध्येचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. यामध्ये नाना पटोलेंनी देखील एकनाथ शिंदे आणि भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, “यांना हिंदूंचे ठेकेदार म्हणून कुणी प्रमाणपत्र दिलेलं नाही. भगवे कपडे घालून कुणी हिंदू होत नाही. स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणणं हे एकप्रकारे सोंग घेणं आहे. रावणानंही भगवे कपडे घालून सीतेचं अपहरण केलं होतं. त्यामुळे भगवे कपडे घालून सगळे साधू संत होतात असं नाही.”अशा शब्दात टीका केली आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी ही टीका केलेली असतानाच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, भगवी बिकीनी चालत नाही पण भगवा कार्पेट चालतो. बिन्धास्त पादत्राणे घालून भगवा कार्पेट तुडवा. जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळून सत्तेचा सारीपाट भाजप कसा मांडते याचं हे उदाहरण. दांभिकपणा हा भाजपचा स्थायीभाव आहे. धार्मिक द्वेष पसरविण्यातून यांचे राजकारण होते पण देश कमजोर होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!