Eknath Shinde | शिंदे- फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा की फक्त गाजर; वाचा सविस्तर

Eknath Shinde | मुंबई : सध्या अवकाळी पावसामुळे  (Unseasonal rain) राज्यातील काही भागामधील फळबागांसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत अनेक वेळा अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्याला सहन करावा लागला आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government’s ) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याची माहिती सीएमओ ट्विटद्वारे देण्यात आली आहे. तर मार्चमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचणार असल्याची माहिती सीएमओ ट्विटद्वारे देण्यात आली आहे.

शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी

तसचं शिंदे- फडणवीस सरकारने २८ जिल्ह्यांना मार्च २०२३ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये महसुली विभागनिहाय वितरीत निधी हा पुढील विभागाला मिळणार आहे. यामध्ये अमरावती विभाग – २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभाग- ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग- ५ कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजी नगर- ८४ कोटी ७५ लाख १९ हजार असा निधी असून एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असं म्हटलं जातं आहे. परंतु मिळालेला निधी शेतकऱ्याच्या खात्यात कधी पर्यंत येणार? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात असून हा निधी म्हणजे फक्त सरकार शेतकऱ्याला गाजर दाखवत असल्याचं देखील म्हटलं जातं आहे.

Shinde-Fadnavis government’s relief to farmers

याचप्रमाणे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात काही जिल्ह्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अहमदनगर ( Ahmednagar) आणि धाराशीव (Darashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तसंच मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवादही देखील साधणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु गेल्या २ महिन्यामध्ये साधारण तीन वेळा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान झालं. परंतु सरकारकडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळत नसल्याने शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त केली जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.