Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या तेलंगणा दौऱ्यावरून राजकीय चर्चांना उधाण!

Aaditya Thackeray | हैद्राबाद : महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मागील सहा महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आपला पक्ष पुन्हा जोमाने उभा राहिला पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर सभा घेत मैदान गाजवताना पाहायला मिळत आहेत. तर आज आदित्य ठाकरे तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. गीतम विद्यापीठाच्या माध्यमातून युवा राजकारणी आयोजित कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तसंच त्यांनी दौऱ्यादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) याचे सुपुत्र के टी रामाराव (K. T. Rama Rao) यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

के टी राव यांच्याकडे तेलंगणाचे नगरविकास मंत्री पद आहे. तेलंगणा राज्यात झालेला विकास बघता तो पॅटर्न महाराष्ट्रात रुजवण्यासाठी के चंद्रशेखर राव यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी नांदेड येथे येऊन विविध घोषणा करत हाक देखील दिली आहे. तर तेलंगणा राज्यात झालेली प्रगती आणि शेतकऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने उचलेली पावले यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज आणि एकरी दहा हजार रुपयांची मदत यामुळे त्याला महाराष्ट्रातुन चांगला प्रतिसाद मिळेल असं म्हटलं जातंय. याशिवाय मागील काही दिवसापासून बिआरएस पक्ष सुद्धा महाराष्ट्रात प्रवेश करू इच्छित आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांनी आजच्या संवाद कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं. तर नक्की ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच गेलेत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

आगामी काळात युतीची नांदी असेल का?

आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मागील बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळतं आहेत. पक्षांची मजबूत आघाडी बनवण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. आगामी वर्ष हे निवडणूकांचं वर्ष असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काळात महाराष्ट्रात महानगरपालिका तसेच राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका जवळ येत असल्यामुळे येत्या काळात राजकीय समीकरणे जुळवून घेण्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करत असल्याचं दिसून येते. यापूर्वी तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली होती. तसंच आगामी काळात ते अखिलेश यादव यांच्यासोबत देखील त्यांची भेट नियोजित आहे. यामुळे या गाठीभेटी आगामी काळात युतीची नांदी असेल का? असं प्रश्न उपस्थित केला जातोय.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.