Weather Update | पावसाबद्दल हवामान खात्याकडून मोठी अपडेट! ‘या’ जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीने (Hail) चांगलंच झोडपलं आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या’ जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा (These districts are warned to be alert)

पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. नंदुरबार, नाशिक, धुळे, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यामध्ये गेल्या 24 तासांत सोलापूर येथे उच्चांकी म्हणजेच 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद (Weather Update) झाली  आहे. तर धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. त्याचबरोबर वर्धा, नागपूर, ब्रह्मपुरी, परभणी या ठिकाणी तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसच्या पार होता.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात (Due to unseasonal rains, farmers in the state are in trouble)

गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ (Weather Update) घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. या नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे तयार करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या