Raj Thackeray | बाळासाहेबांवर केलेल्या ‘त्या’ विधानमुळे उद्धव- राज ठाकरे एकत्र! व्हिडीओ शेअर करत केलं आवाहन

Raj Thackeray | मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil )यांनी बाबरीच्या मुद्दयावरून बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी पत्रकार परिषदे घेऊन चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदेंवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा देत ज्यांनी बाळासाहेबांच्या प्रमाणिकपणावर,शौर्यावर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे त्यांनी तो बघावं असं आवाहन केलं आहे.

तर चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीदीबाबत एक खळबळजनक दावा केला होता की, बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये झाला हे म्हणणं चुकीचं आहे. बाबरी मशीद पाडकामाचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केलं होतं असं वक्तव्य त्यांनी केलं. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद थेट चंद्राकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवाय शिंदे गटाला अनेक सवाल केले आहेत. तसंच त्या दिवशी घडलेला प्रसंग देखील त्यावेळी सांगितला. हाच प्रसंग सांगणारा व्हिडीओ राज ठाकरे यांनी शेयर केला आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी ऐका हा व्हिडिओ: राज ठाकरे

दरम्यान, कितीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद असले तरीही जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा विषयी बोललं जातं तेव्हा मात्र दोघे एकत्र पाहायला मिळतात असं या प्रसंगी पाहायला मिळतं आहे. याआधी देखील एक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं चित्रही वारंवार दिसलं आहे. उद्धव ठाकरेंची तब्येत बिघडली तेव्हा राज त्यांना भेटायला गेले होते. तर काही प्रसंगामध्ये उद्धव यांनी त्यांची पाठराखण केल्याचं दिसलं. तर आजही बाळासाहेबांसाठी दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनीप प्रसंग ऐकण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-