Anna Hazare | अहमदनगर : राज्यात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यवरून वाद पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांची नासाडी केलेली पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शेतीच्या वादातून ही धमकी देण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोणी दिली जीवे मारण्याची धमकी -(Who threatened to kill)
तर शेतीच्या वादातून श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने यांनी १ मे रोजी अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं म्हटलं आहे. कारण शेतीच्या वादात न्याय मिळावा यासाठी संतोष गायधने यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिलं होतं त्यामध्ये त्यांनी मदतीची मागणी केली होती. मात्र अण्णा हजारे यांनी निवेदनाची दखल घेतली नसल्याचा आरोप गायधने यांनी केला आहे. तसंच राळेगण सिद्धीत जाऊन अण्णांची हत्या करणार असल्याचा इशारा गायधने यांनी दिला आहे.
दरम्यान, गायधने यांनी सांगितलं की, मी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची याचिका दाखल केली आहे. मात्र मी कायर नाही अण्णा हजारेंची हत्या करणार हे जाहीरपणे सांगू शकतो. असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Director Of Education | शिक्षण संचालनालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध
- IPL 2023 | CSK संघावर बंदी घाला! तमिळनाडूच्या आमदारानी केली मागणी; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- BJP | चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेबांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपमध्ये उघड नाराजी!
- Job Opportunity | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) मध्ये नोकरीची संधी! ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले