Maharashtra Weather | आजही हवामान विभागाकडून राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा ; तर नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला फटका

Maharashtra Weather : एक महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. तर 8 एप्रिल ते 10 एप्रिलला राज्यातील काही जिल्ह्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्याआधी हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला होता. परंतु आजही आजही कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला आहे तर काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज देखील दर्शवला आहे.

याचप्रमाणे 13 ते 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत देखील आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यरात्रीत मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं काही ठिकाणी झाडांची पडझड देखील झाली आहे. तर काही ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडून गेले आहेत.

शेतकऱ्याच्या पिकांना मोठा फटका-(Big hit to farmers’ crops)

गेल्या पाच ते सहा दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागासह पिकांचे नुकसान झाले आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांची वावरातच नासाडी झालेली पाहायला मिळतं आहे. याचप्रमाणे सर्वात जास्त फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाला बसला आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानामुळे शेतकरी सरकारला मदतीची हाक देत आहे.

नाशिकमध्ये कांदा पिकाचे नुकसान (Loss of onion crop in Nashik)

नाशिक (Nashik) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपीट गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. यामुळं जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, दिंडोरी अशा 11 तालुक्यातील गावात अक्षरशः थैमान घातलं आहे. या भागातील जवळ-जवळ 145 गावातील 8468 हेक्टर क्षेत्र बाधित झालं असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना अश्रूही अनावर झाले आहेत. आभाळचं फाटलं तिथं ठिगळं कुठं लावायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तसचं हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे असं म्हटलं जातंय तर अजूनही शेतकऱ्याचा आवाज सरकारला कसा ऐकू येत नाही?अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहेत.nतर पुढील दोन ते तीन दिवस शेतकऱ्यांच्या पिकांसाठी नुकसानाची आहेत असं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.