Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया

बंगळुरु | आज (13 मे) कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेसने बाजी मारली असून ‘कनकपुरचा पहाडी नेता’ म्हणून ओळखलं जाणारे काँग्रेस नेते डीके शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सात वेळ आमदार म्हणून त्यांनी काम केलं तसचं कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. परंतु हार न मानता पुन्हा राजकीय वर्तुळात उतरून विजयी पताका त्यांनी फडकवला आहे. विजयानंतर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : डीके शिवकुमार

माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून विजय झाल्याबद्दल जनतेचे आभार मानले. तसचं हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईतील विजय असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. तसचं मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना याचं श्रेय देतो .ज्यांनी खूप कष्ट करून अनेक लोकांचा पर्दाफाश केला आहे. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना विजयाची हमी दिली होती. यामुळे शेवटी विजय हा आपलाच झाला. याचप्रमाणे बोलताना भावूक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागले. त्यावेळी त्यांनी ते तुरुंगात असताना सोनिया गांधी यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. त्या भेटीची आठवण झाली असल्याचं म्हणत ते भावुक झाले होते.

दरम्यान, डीके शिवकुमार यांनी तुरुंगातील एक क्षण। देखील माध्यमांसमोर मांडला. ते म्हणाले की, जेव्हा सोनिया गांधी तुरुंगात मला भेटायला आल्या होत्या, ते मी विसरू शकत नाही, मी पदावर राहण्याऐवजी तुरुंगात राहणं निवडलं, पक्षाचा माझ्यावर इतका विश्वास होता.’ यामुळे आजची लढाई माझ्यासाठी आणि पक्षासाठी महत्वाची होती. आमदार फोडले गेले, तुरुंगात टाकलं गेलं परंतु लढाई संपली नव्हती. आज ही लढाई आम्ही जिंकली आहे. असं डीके शिवकुमार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-