Share

Eknath Shinde | ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला नेमका कुणाला?

Eknath Shinde | सातारा: सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीर सभा घेतली. सातारा दौऱ्या दरम्यान झालेल्या सभेमध्ये त्यांनी ठाकरे गटावर सडकवून टीका केली आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर हे … Read more

Published On: 

Eknath Shinde | सातारा: सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीर सभा घेतली. सातारा दौऱ्या दरम्यान झालेल्या सभेमध्ये त्यांनी ठाकरे गटावर सडकवून टीका केली आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार आहे. गोरगरिबांना न्याय देणे हेच सरकारचं काम आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं आहे.”

कर्नाटक निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे म्हणाले, “कुणाला कशात आनंद वाटतो कळतच नाही. दुसऱ्यांच घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करतात. मात्र स्वतःच घर जळालं आहे ते आधी वाचवावं”, असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. “बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लागला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे (What did Uddhav Thackeray say?)

कर्नाटक निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटकमध्ये भाजपला नाकारण्यात आलं आहे. भाजपचा फोडाफोडीचं राजकारण कर्नाटकमधल्या लोकांना आवडलेलं नाही. कर्नाटकनंतर भाजपला आता आम्ही महाराष्ट्रातून घालवणार आहोत.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install