Prithviraj Chavan | “भाजप पराभव सहन करणार नाही…” ; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली भीती

Karnataka Election Results 2023 | मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकालमध्ये काँग्रेस (Congress) आघाडीवर आहे. यावरून भाजपची (BJP) खिल्ली उडवली जातेय. तर कर्नाटकातील विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय नाट्य घडलं होतं. तसचं नाट्य महाराष्ट्रात घडलं आणि शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आलं. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) यांनी भाजपावर टीका करत भीती व्यक्त केली आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ( What did Prithviraj Chavan say)

जर कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला तर “भाजपा हा पराभव सहन करणार करू शकणार नाही. काहीतरी क्लृप्त्या सुरूच ठेवील”. याचा परिणाम संपूर्ण देशभर होईल. अशी भीती व्यक्त केली आहे. कारण कर्नाटक आणि महाराष्ट्रात घोडाबाजार करून सरकार खाली खेचलं. तेव्हा प्रचंड पैशांचा गैरवापर झाला, इडी, सीबीआय अशा संस्थानचा गैरवापर करण्यात आला, पैशांचं आमिष दाखवलं गेलं. ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली तीच महाराष्ट्राला गोष्ट लागू होते. आतापर्यंत भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी आर्थिक व्यवहार करूनच सरकार स्थापन केलं आहे. अशी टीका चव्हाणांनी भाजपवर केली.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी असं देखील म्हटलं की, भाजप सरकारने आधी आर्थिक व्यवहार केला त्यानंतर सत्तास्थापनेसाठी खर्च झालेला पैसा वसूल करण्याकरता वसुली सुरू केली. कोणतंही काम करताना सरकार ४० टक्के कमिशनने काम करतंय,ही खोटी माहिती नाही. तर याविषयी एका कंत्राटदाराने पंतप्रधानांना पत्र देखील लिहिलं होत. या पत्रात सरकारचं आणि संबंधित मंत्र्याचीही नाव लिहिलं होती परंतु, दुर्दैवाने त्या कंत्राटदाराने नंतर आत्महत्या केली”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. याचप्रमाणे काँग्रेसने मात्र विकासाच्या कामावर बेरोजगारी, महिलांसाठी अनेक योजनांचे आश्वासन दिल्याने काँग्रेसला यश मिळालं आहे. नक्की हा काँग्रेस कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करेल असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यामुळे काही वेळातच कर्नाटक निवडणूक मध्ये कोण बाजी मारतय हे पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Back to top button