Sanjay Raut | काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे – संजय राऊत

Karnataka Election Results | मुंबई : सर्वांचं लक्ष आज (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने (Congres) पहिला 16 हजार मतांनी विजय मिळवत भाजपला (BJP) मागे टाकलं आहे. काही तासातच कर्नाटकचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजपसह नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमित शहांवर ( Amit Shah) टीकास्त्र सोडलं आहे. तसचं काँग्रेसच सत्ता स्थापन करणार असा दावा देखील त्यांनी केला आहे.

मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे : संजय राऊत

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, चित्र स्पष्ट असून कर्नाटकात काँग्रेस फक्त आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. यामुळे लवकरच भाजपचा पराभव होणार असून मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. कारण हा पराभव भाजपचा नसून नरेंद्र मोदींचा आहे. गेल्या एक महिन्यापासून या दोन नेत्यांनी कर्नाटकात तंबू ठोकला होता परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जनतेने त्याना नाकारलं आहे. यामुळे आता कर्नाटकातून भाजपची सत्ता हद्दपार होणार असल्याचं पाहायला मिळेल.

(Sanjay Raut Commented On Narendra Modi )

दरम्यान, पुढे राऊत म्हणाले की, आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी कर्नाटक निवडणूक महत्वाची होती. जर
कर्नाटकातील निकाल काँग्रेसच्या बाजूने आला तर आगामी निवडणुकीत सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. असं देखील संजय राऊत म्हणाले. याचप्रमाणे त्यांनी फडणवीस आणि शिंदे सरकारवर देखील टीका केली. आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कामाकडे लक्ष दिले परंतु त्या ठिकाणी सुद्धा एकही जागा निवडून येऊ नये म्हणून फडणवीस आणि शिंदेंनी पैशांचा महापूर ओतला. अशा शब्दांत राऊतांनी टीका केली .

महत्वाच्या बातम्या –

Back to top button