Karnataka Election Result | बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर, तर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समिती पिछाडीवर

Karnataka Election Result | कर्नाटक: कर्नाटक निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी आहे. संपूर्ण देशाचे लक्ष कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीकडं लागलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यातील 36 केंद्रावर मतमोजणी सुरू आहे.

निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सरळ लढत दिसत आहे. मात्र, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराशा झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला नाही. तर बेळगाव जिल्ह्यात 18 मधील 13 मतदार संघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे.

सर्वाधिक लक्ष असलेल्या निपाणी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील सध्या 800 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे बेळगावमध्ये काँग्रेसची आघाडी असल्याचे दिसून आलं आहे. तर अथणीमधून लक्ष्मण सवदी आघाडीवर आहेत.

दरम्यान, सध्या सुरवातीच्या कलांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि जेडी (एस) चे एचडी कुमारस्वामी यांनी आघाडी घेतलीये. याशिवाय, सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, निखिल कत्ती आघाडीवर असल्याचं दिसत आहेत. यामुळे कर्नाटक निवडणुकीत भाजप सत्तेत कायम राहणार का सत्ता परिवर्तन होऊन काँग्रेस सत्तेत येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button