Jitendra Awhad | “प्रभू हनुमानाला ही गोष्ट आवडलेली…”; कर्नाटक निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर घणाघात

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर घणाघात (Jitendra Awad criticizes BJP)

कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपने बजरंगबली अर्थात हनुमानाला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं आहे. ‘कर्नाटक निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झालीय.
काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार बनवत असल्याचं स्पष्ट होत आहे.
या निवडणुकीत भाजपने बजरंग बली अर्थात हनुमानाला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता.
परंतु खुद्द प्रभू हनुमानाला देखील ही गोष्ट आवडलेली दिसत नाहीये.
हनुमान चालिसा मध्ये एक कडव आहे.”महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी..!”
अर्थात-
महावीर बजरंग बली हे पराक्रमी आहेत.
ते दुर्जनांच निराकरण करतात तर सज्जनांच्या सोबत उभे राहतात. थोडक्यात आज खुद्द बजरंग बलीने देखील ते नेमके कोणासोबत आहेत हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या देशाला दाखवून दिले आहे,’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. परंतु, कलांवरून कर्नाटकमध्ये काँग्रेसचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दिसून येत आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहे.

महत्वाच्या बातम्या