Karnataka Election Result | ‘चित्रा ताईचा पायगुण अत्यंत वाईट’; रूपाली पाटील ठोंबरेंचं चित्रा वाघांवर टीकास्त्र

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या  आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे.

भाजपची पिछाडी आणि चित्र वाघ यांच्यावर रूपाली ठोंबरे पाटील यांनी ट्विट करत टीका केली आहे. ‘आयोपा ,स्टार प्रचारक भामटे हिंदुत्व असलेल्या चित्रा ताईचा पायगुण अत्यंत वाईटच. कर्नाटक मध्ये खाजप 70 वरच
जय हो कानडी जनता जय हो. #chitra_wagh #हिटलरशाहीनस्तनाबूतवाटचालीकडे’, असं ट्विट करत रूपाली ठोंबरे पाटील यांनी चित्र वाघांवर टीकास्त्र चालवलं आहे.

कर्नाटक निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समावेश होता. चित्रा वाघ प्रचाराला गेल्यामुळे भाजपला कमी जागा मिळत असल्याचं रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कर्नाटक निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “मोदी हैं तो मुनकीन हैं, असं काही नसतं. मोदींना देखील हरवता येतं. कर्नाटकचा विजय ऊर्जादायी असणार. फडणवीसांनी कर्नाटकामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काहीच गरज नसताना फडणवीस यांनी बजरंगबलीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, या सगळ्यांचा अजिबात फायदा झाला नाही. असे तेढ महाराष्ट्रात वापरताना फडणवीस आता दहा वेळा विचार करतील.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.