Share

Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Jitendra Awhad | मुंबई : काल (18 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात महाराष्ट्र भाजप (BJP) कार्यकारिणीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मंत्री। देखील उपस्थित होते. दरम्यान  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनाम्यावर भाष्य करत पवारांवर टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड (What did Jitendra Awhad say)

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी पवारांवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हटलं की, “गेले 60 वर्ष झालं राजकारण फिरत आहे. यामुळे शरद पवारांना कोणत्याही ड्राम्याची गरज नाही” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर अशी टीका केली होती की, गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की, “मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देणार आणि मीच राजीनामा मागे घेणार”. टीआरपी कसा मिळवायचा हे पवारांना माहिती आहे, असं म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली. तसचं शरद पवारांनी ठाकरेंना दाखवून दिलं की राजीनामा कसा द्यायचा असं देखील फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Jitendra Awhad | मुंबई : काल (18 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात महाराष्ट्र …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Mumbai Politics Pune

Join WhatsApp

Join Now