Weather Update | राज्यासह देशात वाढणार उन्हाची तीव्रता, हवामान विभागाचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण होत आहे. अशात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. तर आज देशातील बहुतांश भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

आज विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर आर्द्रतेमुळे अधिक उकाडा जाणवू शकतो. गुरुवारी (18 मे) राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतात. तर अकोल्यामध्ये 42.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), आज राजधानी दिल्लीमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राजस्थानमध्ये देखील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशापार जाण्याची शक्यता आहे. तर नागालँड, आसाम, अरुणाचल, प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.