Devendra Fadnavis | पुणे: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. उद्धवजींचा पोपट मेला आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र चालवलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जिल्हा परिषद असो किंवा लोकसभा-विधानसभा निवडणूक असो, आपला निवडून येण्याचा फॉर्मुला एकच आहे. तो म्हणजे नरेंद्र मोदीजींची कार्यशैली. महाराष्ट्रामध्ये कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. इथे फक्त मोदींचा पॅटर्न चालणार.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आमचं सरकार पूर्णपणे घटनात्मक आहे. भाजप आणि सेनेची युती भक्कम आहे. आज महाविकास आघाडीकडे फक्त शिल्लकसेना आहे. येत्या महानगरपालिका निवडणूका असो किंवा लोकसभा-विधानसभा निवडणूका असो भाजप सेनेची युती जिंकणार.”
कर्नाटक निवडणुकीवरून देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “ज्यांच्या घरी पोरगं पैदा झालं नाही ते देखील नाचू लागले होते. ज्यांचा एकही माणूस कर्नाटकमध्ये निवडून आला नाही, ते देखील ढोल बडवू लागले. ज्यांचा एकही उमेदवार उभा नव्हता ते देखील बडवू लागले, या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र चालवलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Tuljabhavani Mandir | तुळजाभवानी मंदिर संस्थानांच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत; यापुढे तोकडे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही
- Ambadas Danve | “मुलींची बेपत्ता होण्याची संख्या…”; अंबादास दानवेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
- Kiren Rijiju | किरेन रिजिजू यांची कायदामंत्री पदावरून हकालपट्टी; न्यायव्यवस्थेत ढवळाढवळीचा आरोप !
- Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! पुढील पाच दिवस वाढणार उन्हाचा तडाखा
- Nitesh Rane | “संजय राऊतांचा लव्ह जिहाद…”; नितेश राणेंचं राऊतांवर टीकास्त्र