Anil Mahajan | जळगाव : महावितरणच्या जळगाव मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी श्री.अनिल महाजन नुकतेच रुजू झाले आहेत. श्री.महाजन यापूर्वी कल्याण परिमंडल कार्यालयात कार्यकारी अभियंता (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. नुकतीच त्यांची अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती झाली आहे. श्री.महाजन यांनी आपल्या कारकिर्दीत अति उच्च दाब उपकेंद्रासह पारेषण वाहिनी उभारणीत मोलाचा वाटा उचललेला आहे. तसेच त्यांनी अलिबाग (जि.रायगड), बदलापूर (जि.ठाणे ) उपविभाग, पनवेल ग्रामीण विभाग कार्यालय, रत्नागिरी विभाग, मुख्य कार्यालय मुंबई येथे वाणिज्य विभाग ( ओपन अॅक्सेस, सोलर रूफ टाॅप), परिमंडळ कार्यालय कल्याण येथे विविध पदांवर उल्लेखनीय काम केलेले आहे.
जळगाव मंडलात वीजग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम करणार आहे. मंडलातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ग्राहकसेवा उंचावण्यावर भर देणार आहे, असे अधीक्षक अभियंता श्री.अनिल महाजन यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
- Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! पुढील पाच दिवस वाढणार उन्हाचा तडाखा
- Nitesh Rane | “संजय राऊतांचा लव्ह जिहाद…”; नितेश राणेंचं राऊतांवर टीकास्त्र
- Raosaheb Danve | 2024 निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत फूट पडणार; रावसाहेब दानवे यांचं भाकीत
- Sanjay Raut | रावसाहेब दानवेंनी निवडून येऊन दाखवावं; संजय राऊतांचं दानवेंना खुलं आव्हान
- Mumbai Police | एकीशी साखरपुडा दुसरीशी लग्न करणाऱ्याची पोलिसांकडून वरात