Sushma Andhare | सुषमा अंधारेंवर मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या ‘त्या’ जिल्हाप्रमुखांवर उद्धव ठाकरेंची कारवाई

Sushma Andhare | मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुषमा अंधारे मारहाण प्रकरणावर मोठी कारवाई केली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर मारहाण केल्याचा दावा केला होता. मात्र, अंधारें हा दावा खोटा असल्याचे म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

सुषमा अंधारे यांनी फेसबुक लाईव्ह घेत घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. त्याचबरोबर आप्पासाहेब जाधव यांनी केलेला दावा खोटं असल्याचं अंधारे यांनी सांगितलं आहे. त्यानंतर अंधारे यांच्यावर मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

उद्यापासून बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर काल सुषमा अंधारे बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान ठाकरे गटात राडा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओ जारी करत अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले.

दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. सध्या सुषमा अंधारे बीड दौऱ्यावर आहेत. जाधव यांनी अंधारेंवर मारहाण केल्याचा आरोप केला. मात्र, मला मारहाण झालेली नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या