Share

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; पाहा काय आहे प्रकरण?

🕒 1 min readRahul Gandhi | गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या भाष्यानंतर बदनामी प्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती तसचं त्यांचे संसद सदस्यत्व रद्द देखील करण्यात आलं आहे. याचप्रमाणे नोव्हेंबर 2022 मध्ये, भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी वाशिम जिल्ह्यात आयोजित केलेल्या सभेत सावरकरांबद्दल, भाजप (BJP) … Read more

Published On: 

🕒 1 min read

Rahul Gandhi | गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या भाष्यानंतर बदनामी प्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती तसचं त्यांचे संसद सदस्यत्व रद्द देखील करण्यात आलं आहे. याचप्रमाणे नोव्हेंबर 2022 मध्ये, भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी वाशिम जिल्ह्यात आयोजित केलेल्या सभेत सावरकरांबद्दल, भाजप (BJP) आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पुण्यामध्ये मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केली आहे.

तक्रार का दाखल केली? (Why filed a complaint?)

तर सात्यकी सावरकर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांनी यापूर्वी लंडन दौऱ्यावर असताना वीर सावरकरांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. तसंच एका मुस्लिम व्यक्तीला सावरकर आणि त्यांचे पाच- सहा मित्र मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता. असं त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांची ही कथा काल्पनिक आहे. यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानहानी होत आहे, असा दावा करत सात्यकी सावरकर न्यायालयात गेल्या आहेत.

दरम्यान, यामध्ये काहीच तथ्य नसताना अशी विधाने राहुल गांधी करत आहेत. यामुळे आम्ही आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही न्यायालयाने 15 एप्रिलची तारीख दिली असल्याचं देखील सात्यकी यांनी म्हटलं आहे. तर राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत महाराष्ट्र न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या