Sanjay Raut | जेलमध्ये जायचं नाही म्हणत एकनाथ शिंदे माझ्या घरी रडले होते : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : Sanjay Raut | मुंबई : आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केलेल्या बंडाबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे यांना जेलमध्ये जाण्याची भीती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले आणि म्हणाले की, जर मी भाजप सोबत गेलो नाही तर मला इडी द्वारे अटक केलं जाईल. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यला खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा देत मुख्यमंत्री शिंदेंबद्दल गौप्यस्फोट केला.

संजय राऊतांचा गौप्यस्फोट ( Sanjay Raut’s secret blast)

संजय  राऊत म्हणाले की, सध्या संपूर्ण देशात भाजपकडून इडी चा दबाव टाकलं जात आहे. पण आम्ही या दबावाला भीत नाही. तसचं पुढे त्यांनी म्हटलं की, आदित्य ठाकरे यांनी जे सांगितलं ते खरं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मला जेलमध्ये नाही जायचं. त्यावेळी त्यांनी इडीपाठीमागे लागल्याचं देखील सांगितलं. तसचं  बंड केलेल्या आमदार आणि खासदारांपैकीं निम्म्या लोकांवर ईडीच्या कारवाया सुरू होत्या यामुळे या सगळ्यला घाबरून ते भाजपसोबत गेले असल्याचं राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं की, आपण या सगळ्या प्रसंगाला सामोरं जावं. आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत. माझ्यावरही असा प्रसंग येईल, मला देखील अटक करतील अशी भीती आहे. परंतु, मी अटकेच्या तयारीत आहे. असंही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर जे शिंदे गटाबरोबर झालं तेच आता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर भाजप करत असल्याचं देखील राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button