Share

Narayan Rane |”आता मातोश्रीचं पावित्र्य राहिलेलं नाही”: नारायण राणे

Narayan Rane | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले. तसेच ते मातोश्रीवर येऊन रडत होते. असं विधान उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधनावर खळबळ उडाली आहे. तर शिंदे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील आल्या. याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते लहान आहेत सोडून द्या असं दोनच शब्दात म्हणत या विषयाला पूर्णविराम दिलेला पाहायला मिळतं आहे. परंतु भाजपचे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांनी “मातोश्रीचं पावित्र्य राहिलेलं नाही” असं म्हणतं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले नारायण राणे: (What Narayan Rane said)

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी घरी गेले म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे कधीच कोणाच्या दारी गेले नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आता मातोश्रीचं पावित्र्य राहील नसल्याचं म्हंटलं आहे. त्याबरोबर राणेंना आदित्य ठाकरेनि केल्या वक्तव्यबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मी या प्रश्नावर बोलणार नाही कारण कोण आदित्य? कोण आहे तो? काय आहे त्याला प्रतिष्ठा? बालिश आहे तो ,असं म्हणतं आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

तसचं भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हंटल आहे की, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे गोंधलेली पात्र आहेत. हातातून सत्ता गेल्यावर त्याच मानसिक संतुलन बिघडलेल आहे. म्हणून ते असं वक्तव्य करत आहेत. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

Narayan Rane | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले. तसेच ते मातोश्रीवर येऊन …

पुढे वाचा

Maharashtra Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now