Ravindra Dhangekar | पुण्याचा पाहुणा ( चंद्रकांत पाटील ) किती दिवस ठेवायचा ? – रवींद्र धंगेकर

Ravindra Dhangekar | पुणे : नुकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा पोटनिवडणुकित मविआ विरोध भाजप डाव रंगला होता. त्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आमदार म्हणून निवडून आले. त्या दरम्यान भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट हु इज धंगेकर असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर धंगेकर यांनी निवडणूक लढून मीच धंगेकर अशा शब्दात उत्तर दिलं. परत पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली आहे.

कोणती टीका केली.. 

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पाहुणा? किती दिवस ठेवायचा हे पुणेकर पाहतील. अशा जोरदार शब्दात टीका केली आहे . तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत कळेलच की त्यांनी पुण्यात थांबायचं की कोल्हापूरला जायचं. त्यांच्या बोलण्याचा रुबाब लवकरच पुणेकर उतरवतील असं देखील धंगेकर म्हणाले.

दरम्यान, त्यांनी शिंदे आणि भाजप सरकार देखील भाष्य करत म्हटलं की, भाजपने कितीही प्रयत्न केले तरीही पुण्याची लोकसभा निवडणूक जिंकू शकणार नाही. विजय हा महाविकास आघाडीचाच असेल. याचप्रमाणे लोकसभेची जागा मविआ मधून कोण लढणार याबाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर दिल की याबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.
तर आगामी निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना भिडणारे रवींद्र धंगेकर पुण्याच्या राजकीय वर्तुळात तयार झालेले पाहायला मिळत आहे. यामुळे आगामी निवडणूक काटे की टक्कर होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-