Sharad pawar | राहुल गांधींच्या बैठीकीला शरद पवार गेले नाहीत; राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

Sharad pawar | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit pawar ) हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरी बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बुधवारी (12 एप्रिल )दिल्ली मध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीला न गेल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आज माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे टाळले आहे.

काय म्हणाले शरद पवार ?( what didi sharad pawar say?)

माध्यमांनी शरद पवार ( sharad pawar) यांना अनेक प्रश्न विचारले . त्यामधील पहिला प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजप (BJP) सोबत सत्ता स्थापन करणार का? अस विचारलं असताना शरद पवार म्हणाले, ‘मला माहित नाही’ त्यांच्या या उत्तरामुळे महाराष्ट्रीत सत्तांतराबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसचं बुधवारी (12 एप्रिल ) ला दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँगेस नेते राहुल गांधी( Rahul Gandhi) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची बैठक पार पडली. त्या बैठकीला शरद पवार यांची उपस्थिती नव्हती. याबाबत पवारांना विचार असता शरद पवार म्हणाले की, बैठकीच्या दिवशी मी दिल्लीत नव्हतो, मला बोलवलं होत पण मला याठिकाणी आज उद्या काही काम आहेत. त्यामुळे मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट घाईल. अशा प्रकारे पवार यांनी काही प्रश्नाची उत्तर देणे टाळलं यामुळे चर्चा रंगू लागल्या आहेत.

तसचं गेल्या काही दिवसांपासून विरोध पक्ष नेते हे देखील संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर ट्विट करत भाष्य केलं होतं की, मंत्रालयातील एका व्यक्तीच्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १५ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करतील, असा दावा केला होता. परंतु त्यानंतर अजित पवारांनाही याबाबत उत्तर देणं टाळलं आहे. “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा लहान कार्यकर्ता काय बोलणार?” असं म्हणत अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नक्की काय खेळी आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-