Rahul Gandhi । शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाणार? चर्चांना उधाण

Rahul Gandhi । नवी दिल्ली : नुकतीच राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar )आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट झाली. या भेटीमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली असल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये भेटी गाठींचा हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी प्रकरण असो किंवा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांवर केलेलं वक्तव्य असो यामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मोठ्या प्रमाणावर मतभेद पाहायला मिळतं होते परंतु आता हे डॅमेज कंट्रोल करणं सुरू आहे असं दिसत आहे. याच पार्श्ववभूमी शरद पवारच्या भेटीनंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) लवकरच मातोश्रीवर (Matoshree) येणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याची नेमकी तारीख निश्चित झाली नाही तरीही येत्या काही दिवसांत ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेण्याची शक्यता (Rahul Gandhi likely to meet Uddhav Thackeray on Matoshree)

तसचं गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. विशेषतः ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी काँग्रेसकडून हे डॅमेज भरून काढण्याचं काम सुरू असल्याचंही बोललं जात होतं. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट त्यासाठीच होत असल्याच्याही सध्या चर्चा रंगल्या आहेत. या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Election 2024) चर्चा होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. तर, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे.

तर लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी राहुल गांधी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटत असल्याचं दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र राहून काम करण्यावर राहुल गांधी यांनी भर दिला आहे. तसचं नुकतीच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची राहुल गांधींसोबत भेट झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. विरोधी पक्षांचे ऐक्य हा या भेटीं मागचा मुख्य हेतू होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच विरोधी पक्षांच्या या भेटीगाठी वाढल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-