Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत “आम्हीच जिंकू ४८ पैकी ४० जागा ” : संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut । मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने हालचाली सुरु केल्या आहेत. मग ते काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलेत असोत. किंवा काही दिवसातच राहुल गांधी उद्धव ठाकरेची मातोश्रीवर येऊन भेट घेणार अशी चर्चा असो. या सगळ्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते कि आगामी निवडणुकित भाजप (BJP) विरोधात महाविकास आघाडी याची काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे. तर आताच खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत (What did Sanjay Raut say?)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांचं ऐक्य होणार नाही, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम लवकरच तुटून पडेल आणि लोकसभा निवडणुकीत विरोधक ४८ पैकी ४० जागा जिंकतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसचं त्यांनी पुढे म्हटलं की, प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष एकत्र येण्याला सुरुवात झाली ही आशादायी गोष्ट आहे. यामुळे महाविकास आघाडी एकजुटीने भाजपचा पराभव करणार आहे. सध्या राहुल गांधी यांनी सगळ्या प्रमुख विरोधी पक्षांना भेटून एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आम्हीही त्यांच्या सोबत आहोत. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत चर्चा झाली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रात या. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ४८ पैकी ४० जागा जिंकू. सत्तापरिवर्तन होणारच.

दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीबद्दल देखील भाष्य केलं. काल शरद पवार हे राहुल गांधी आणि खर्गेंना भेटले. त्याच्यामध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली. महाविकास आघाडीने निवडणुकीच्या आखणीला सुरवात केली आहे. याआधी देखील काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार – तेजस्वी यादव यांची बैठक झाली. असं देखील राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-