Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल, तर ‘या’ फळांचे सेवन करणे टाळा

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याची सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनाच्या समस्येला झुंज देत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक जिममध्ये घाम गाळत असतात. मात्र, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत सकस आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहाराचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य ही तंदुरुस्त राहते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही काही फळांचे सेवन करणे टाळले पाहिजे. कारण या फळांमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि फॅट आढळून येतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन नियंत्रणात ठेवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही खालील फळांचे सेवन करणे टाळले पाहिजे.

आंबा (Mango-Weight Loss)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आंब्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. आंब्यामध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त आढळून येते, त्यामुळे आंब्याचे सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. 100 ग्रॅम आंब्यामध्ये सुमारे 80 ते 100 कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही जर जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन केले तर तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.

केळी (Banana-Weight Loss)

केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. केळीचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य निरोगी राहते. पण तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर केळीचे सेवन करणे तुम्ही टाळले पाहिजे. केळीमध्ये कॅलरीज आणि फॅट खूप जास्त प्रमाणात आढळून येते. 100 ग्राम केळीमध्ये सुमारे 166 कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे केळीचे सेवन केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

अननस (Pineapple-Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये अननसाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अननसापासून दूर राहिले पाहिजे. अननसामध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि कॅलरीज आढळून येतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करायचा विचार करत असाल, तर तुम्ही अननसाचे मर्यादित सेवन केले पाहिजे.

उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल तर तुम्ही वरील फळांचे सेवन टाळू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पुदिन्याच्या ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

शरीर डिटॉक्स राहते (The body remains detox-Mint Buttermilk Benefits)

उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे ताक प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. पुदिन्याचे ताक आतडे स्वच्छ करून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. पुदिन्याच्या ताकाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांची संबंधित अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात.

पोटातील गॅस दूर होतात (Eliminates stomach gas-Mint Buttermilk Benefits)

उन्हाळ्यामध्ये जास्त तळलेले किंवा जास्त भाजलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने पोटात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागतो. या समस्यावर मात करण्यासाठी पुदिन्याचे ताक उपयुक्त ठरू शकते. पुदिनाच्या ताकाचे सेवन केल्याने पोटातील गॅसची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर पुदिन्याचे ताक प्यायल्याने पोटात होणारी जळजळ देखील शांत होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या