Share

Chandrashekhar Bawankule । राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule । नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामूळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर काल पुण्यात राहुल गांधीन विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्याच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी होत असल्याच्या पाहायला मिळतं आहेत. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत धमकी वजा इशारा दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? (What exactly did Chandrasekhar Bawankule say?)

राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट जरी कोणाचा डॅमेज कंट्रोल करणं असेल, तरी आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही. सावरकरांची राहुल गांधींनी अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. तीच तीच चूक त्यांनी पाच वेळा केली. अनेकांनी राहुल गांधी यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.

दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते लवकरच मातोश्री वर (Matoshree) येणार आल्याच्या चर्चना उधाण आलं आहे. यावरुनच भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल चढवला आहे. ‘राहुल गांधींनी महाराष्ट्रांत पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी’, असा धमकी वजा इशारा बावनकुळेंनी दिला आहे. यामुळे राजकीय वातावरणात अधिकच तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Chandrashekhar Bawankule । नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या …

पुढे वाचा

Chhatrapati Sambhajinagar India Maharashtra Nagpur Politics