Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | मुंबई: आज सर्वत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जातं आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले पाहायला मिळते. तर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या घोषणा करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या.. (What announcements did the Chief Minister make?)

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत. त्यानिमित्ताने बार्टीच्या ८६१ जणांना फेलोशिप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर ८६१ जणांच्या फेलोशीपपोटी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याचप्रमाणे लाँग मार्चदरम्यान मृत पावलेल्या पुंडलिक जाधव या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिल्याचं सांगितलं आहे. मृत पुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांना यावेळी मुख्यमंत्री यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

दरम्यान,एकनाथ शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांचं इंदू मीलमध्ये होणारं स्मारक हे जागतिक दर्जाचं होत आहे. आपण परदेशात जातो. परंतु परदेशातील लोक हे स्मारक बघायला येतील, असं स्मारक इंदू मीलमध्ये उभा राहात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. याचप्रमाणे वंचित, पीडित घटकातील नागरीक हक्कांपासून, शिक्षणापासून दूर राहू नयेत, यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचं शिंदे म्हणाले. या महत्वाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. तर आता राज्यात अवकाळी पावसाने थैमाल घातलं असल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना मात्र नुकसान भरपाई बद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही ठोस निर्णय घेतलेले दिसत नाहीत यामुळे शेतकरी नाराज आहेत.

महत्वाच्या बातम्या-