Ravindra Dhangekar । पुण्यात पुन्हा वाद पेटणार? ‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’; या गाण्याची सर्वत्र जोरदार चर्चा!

Ravindra Dhangekar । पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी आणि भाजपकडून पक्षातील कोणता उमेदरवार हि जागा लढणार यासाठी चाचपणी सुरु आहे. तर गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले होते की, चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पाहुणा? किती दिवस ठेवायचा हे पुणेकर पाहतील. अशा जोरदार शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता या दोघांच्याही वादावादीवर नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. या गाण्यात चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली आहे, शिवाय चंपाबाई असा चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे पुण्यात नव्या वाद पेटण्याची शक्यता आहे.

काय आहे नक्की ते गाणं: (What exactly is that song)

तर हे गाणं उमेश गवळी आणि प्रदीक कांबळे यांनी लिहिलं आणि गायलं आहे. यामध्ये ‘एकजुटीने साऱ्यांच्या मताने कसा उधळून लावलाय डाव, हू इज धंगेकर, चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव. चंपा बाई आमदाराला जीव थोडा लाव’, असं म्हंटलं आहे. तर या गाण्यात पालकमंत्री आणि ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा चंपाबाई असा उल्लेख केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तर आता चंद्रकांत पाटील या गाण्यावर काय प्रतिकिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तसचं याआधी कसबा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी भरसभेत हू ईज धंगेकर तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे रवींद्र धंगेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात टीका टिपणी सुरु झाली. भाजपने धंगेकरांना पराभूत करण्यासाठी चांगलीच फौज मैदानात उतरवली होती. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. परंतु धंगेकरांनी निवडणूक जिंकून दाखवली त्यानंतर मी तोच आमदार धंगेकर अशा पाट्या पुण्यात पाहायला मिळाल्या. आता या नवीन गाण्यामुळे पुन्हा एकदा धंगेकर आणि पाटील वाद पेटणार असल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.