Mumbai Municipal Corporation | मुंबई पालिकेत चिंधी चोरांचा सुळसुळाट! ग्लास, चमच्यासह जेवणाची ताटंही गायब

Mumbai Corporation| मुंबई : आशिया खंडातील सर्वात सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिलं जातं. संपूर्ण मुंबईचा कारभार सांभाळणारी मुंबई महापालिका मुंबईकरांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते. परंतु, एक धक्कादायक प्रकार या महापालिकेच्या मुख्यालयाच्या (BMC) उपहारगृहातून (canteen) घडला आहे. गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नक्की काय घडलं: (What exactly happened)

महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागावतात पण खावून झाल्यानंतर ही भांडी उपहारगृहाला परतच करत नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे ही भांडी मागितल्यास त्यांच्याकडून मात्र आपण घरातूनच ती आणल्याचे सांगितलं जाते. या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले असून भांडी परत करण्याचे आवाहन कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे. तर या आवारात एकूण 50 पेक्षा जास्त कार्यालये आहेत.

दरम्यान, हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी मुंबईच्या महापालिकेच्या कॅन्टीनबाहेर सूचना फलक लावण्यात आला आहे. उपहारगृहातून भांडी बाहेर घेऊन जाऊ नका! अशी सूचना या फलकावर लिहिण्यात आली आहे. मागील वर्षभरात कॅन्टीनमधून हजारो भांडी गायब झाली असून 40 ते 50 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

एवढी भांडी झाली गायब:

चमचे – 6 ते 7 हजार लंच प्लेट – 150 ते 200 नाश्ता प्लेट – 300 ते 400 ग्लास 100 ते 150 –

दरम्यान, भांडी चोरू नका आणि चोरलेली परत करा असे आवाहन करणारा फलक देखील महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये लावण्यात आला आहे. यामुळे आता तरी काही फरक पडतो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.