Share

Weather Update | राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यात बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात हवामान खात्याकडून राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यात बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात हवामान खात्याकडून राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी (Yellow alert of rain issued in ‘these’ districts)

राज्यामध्ये आज (15 एप्रिल) मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आहे. राज्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना, दुसरीकडे उन्हाचा तडाका वाढत चालल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. उकाडा वाढल्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहे. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात देशातील उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती, नागपूर, सोलापूर या ठिकाणी तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे होता. तर उर्वरित राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 36 ते 41 दरम्यान होते.

पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात (Farmers in the state are in trouble due to rain)

गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Weather Update) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. या नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे तयार करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही