Amol Kolhe |अमोल कोल्हेंचं राष्ट्रवादी सोडणार का? या प्रश्नावर सूचक वक्तव्य; म्हणाले…

Amol Kolhe | कराड : सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024) तयारीला लागलेलं पाहायला मिळतं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील एका मुलाखतीत अमोल कोल्हे जर भाजपमध्ये येणार असतील तर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया दिली होती. तसचं चर्चनादरम्यान, अमोल कोल्हे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट देखील घेतली होती. यामुळे राजकीय ते राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करणार असं बोललं जातं आहे. तर कराड येथे होणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटयाच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आले खासदार अमोल कोल्हे आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणूक लढवणार का? लढवणार तर कोणत्या पक्षाकडून लढवणार? तुम्ही राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यात किती तथ्य आहे? असे प्रश्न विचारल्यावर अमोल कोल्हे यांनी मिश्किल उत्तरे दिली. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं.’ (First look at the sky, look at the wind and then take the plow)

माध्यमांशी बोलताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार की नाही? तसचं भाजपमधून की राष्ट्रवादीतून लढवणार? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सूचक असं वक्तव्य केलं आहे. ‘आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं. त्यामुळे उद्याची निवडणूक लढायची की नाही ते आता कशाला सागायचं?’ असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

तसचं याआधी देखील त्यांनी स्पष्ट उत्तरं देणं टाळलं होतं. तर अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. त्यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी उलटा माध्यमांना प्रश्न विचारला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं याचा अर्थ भाजपमधून ऑफर आहे असा होतो का? असं कोल्हेंनी म्हंटलं आहे. यामुळे आता आगामी निवडणुकीच्या काळात अमोल कोल्हे नक्की कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार या रंगलेल्या चर्चेनंतर आणि अमोल कोल्हे यांनी दिलेल्या उत्तरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्न देखील निर्माण केला जातोय.

महत्वाच्या बातम्या-

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.