Share

BJP| “भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल…” या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

BJP | मुंबई : आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची Amit Shah) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकित अमित शहा मिशन 45 चा आणि मुंबई महानगर पालिका (BMC Elections)  निवडणुकीचाही आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण काय आहे, यासोबतच मुंबई महानगर पालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईत भाजपची काय स्थिती आहे याचा आढावा देखील घेणार आहे. यातच महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या (BJP) अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट पोस्ट करण्यात आलं आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तसचं भाजपमध्ये देखील या ट्विटनंतर अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

नक्की काय आहे भाजपचं ट्विट: (What exactly is BJP’s tweet)

“भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे  आणि हिंदुराष्ट्र राहिल…” असं ट्विट भाजपच्या (BJP) अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आलं आहे. याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवर यांनी, भाजपचा असा कोणताही अजेंडा नसताना, असं ट्विट कुणी आणि का केलं? हे समोर येईलच, असं वक्तव्य केलं आहे  त्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया सेलमधून अशी पोस्ट चुकून केली? की जाणूनबूजून केली गेली? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. कारण याबाबत हिंदुराष्ट्र… ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा भाजपच्या काही नेत्यांनी हिंदुराष्ट्र हीच आपली भूमिका असल्याची प्रतिक्रिया दिली होती. परंतु आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हिंदुराष्ट्र म्हणजे बहुसंख्य हिंदूंचा देश, अशी त्याची व्याख्या केली. तसचं मुनगंटीवर यांनी तर हिंदुराष्ट्राचा अजेंडा, भाजपचा नाही, असं म्हणत, या ट्विटच्या चौकशीचे संकेत दिले.

दरम्यान, भाजपच्या या ट्विटरवर विरोधकांनी देखील जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, भारत हे हिंदुराष्ट्र असेल आणि ते हिंदुराष्ट्रच मानायचे असेल तर या राज्यातील सर्व धर्माचे लोकं वाऱ्यावर सोडून द्यायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण जर असंच असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी न ठेवता ते बदलाव आणि त्यांनी ते हिंदुस्तान जनता पार्टी करावे. असं भाष्य सुषमा अंधारे यांनी केलं तसचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, देशाच्या संविधानाला जे लोक  मानत नाहीत. त्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा केली पाहिजे. भारताचं संविधान आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.जर संविधानचं नसतं तर ते उपमुख्यमंत्री झाले नसते.अशी जोरदार टीका पटोले यांनी फडनवीसांवर केली.

महत्वाच्या बातम्या

 

BJP | मुंबई : आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची Amit Shah) …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now