Wrinkles | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Wrinkles | टीम महाराष्ट्र देशा: लिंबू (Lemon) आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. लिंबामध्ये आढळणारे विटामिन सी त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकते. त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर लिंबाच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील दूर करता येऊ शकतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने लिंबाचा वापर करू शकतात.

दूध आणि लिंबू (Milk and lemon-For Wrinkles)

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यासाठी लिंबू आणि दुधाचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. दूध त्वचेला एक्स्प्लाईट करण्यास मदत करते. परिणामी चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे दुधामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस आणि थोडासा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून एक ते दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, ब्लॅकहेड्स, एक्ने इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात.

लिंबू आणि कोरफड (Lemon and Aloevera-For Wrinkles)

लिंबू आणि कोरफडीचा वापर करून त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या सहज दूर केल्या जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे एलोवेरा जेलमध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचा हायड्रेट राहते. त्याचबरोबर आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात.

हळद आणि लिंबू (Turmeric and lemon-For Wrinkles)

हळद आणि लिंबाच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा हळदीमध्ये एक चमचा मध आणि दोन ते तीन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या समज दूर होऊ शकतात.

त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने लिंबाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर केसातील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने आवळ्याचा वापर करू शकतात.

आवळा पेस्ट (Amla paste-For Dandruff)

केसातील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या पेस्टचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे आवळा पावडरमध्ये आठ ते दहा तुळशीचे पाने बारीक करून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण अर्धा तास केसांवर लावून ठेवावी लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस हर्बल शाम्पूने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते आणि केस मऊ आणि चमकदार होतात.

आवळा आणि कडूलिंब (Amla and bitter lemon-For Dandruff)

केसातील कोंड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आवळा आणि कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. आवळा आणि कडुलिंब आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात, जे केसातील कोंड्याची समस्या सहज दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला आठ ते दहा कडुलिंबाची पाने एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. हे पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन चमचे आवळ्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. शाम्पूने केस धुतल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण केसांना लावावे लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसातील कोंडा दूर होतो आणि केस चमकदार होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.