Job Opportunity | लष्कराच्या ASC सेंटरमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय लष्करामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्कराच्या ASC सेंटरमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 236 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ASC सेंटर (साऊथ)-2ATC मध्ये कुक 02, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 19, निम्न श्रेणी लिपिक (LDC) 05, ट्रेड्समन मेट (लेबर) 109, टिन स्मिथ 08, बार्बर 03 पदाच्या जागा भरण्यात येणार आहे. तर ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC मध्ये MTS (चौकीदार) 17, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 37, क्लीनर 05, व्हेईकल मेकॅनिक 12, पेंटर 03, कारपेंटर 11, फायरमन 01, फायर इंजिन ड्राइव्हर 04 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पाठवण्याच्या अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

ASC सेंटर (साऊथ)-2ATC पदासाठी:  पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, सीएचक्यू, एएससी केंद्र (दक्षिण) –२ एटीसी, आग्राम पोस्ट, बंगलोर -०७
ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC पदासाठी: पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (उत्तर) – 1 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर-07

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1yAN7cydbnpKzX_Nxyjo5LeBl0MIwaOY8/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

http://indianarmy.nic.in/

महत्वाच्या बातम्या